Audio Clip Viral टिम ई सकाळ
देश

काँग्रेस आमदाराने पोलीस अधिकाऱ्याला ७ मिनिटात दिल्या १०० शिव्या; ऑडिओ क्लिप व्हायरल

७ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस आमदाराने १०० पेक्षा जास्त शिव्या दिल्यात.या ऑडिओने क्लिपने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या चित्तौडगड येथे काँग्रेस आमदाराने एका पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याची बाब समोर आली आहे. एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. ७ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस आमदाराने १०० पेक्षा जास्त शिव्या दिल्यात. या ऑडिओने क्लिपने एकच खळबळ उडाली आहे.

चित्तौडगडचे आमदार राजेंद्र सिंह बिधुडी यांची ७.३७ मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते भैंसरोदगड पोलीस स्टेशनचे एसएचओ (SHO) संजय कुमार यांना १०० हून अधिक वेळा शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत.या संदर्भात एसएचओ (SHO) संजय कुमार यांनी आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि एका गुन्हेगारीच्या प्रकरणात एका व्यक्तीस अटक करण्यास दबाव टाकल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय तर आमदार राजेंद्र सिंह बिधुडी यांनी ही ऑडीओ क्लिप बनावटी असल्याचा दावा केलाय. ते म्हणाले,”ऑडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे, मी कधीही शिवीगाळ करत नाही.”

या प्रकरणावर विरोधी पक्ष भाजपने चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी करण्यात येणार आहे.मया आधी एसएचओने चित्तौडगडच्या पोलीस अधिक्षक प्रीती जैन यांनी आमदाराच्या विरोधात लेखी तक्रार दिली होती आणि त्यांची बदली पोलीस लाइंस मध्ये करावी,अशी विनंती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT