एम. व्यंकय्या नायडू Sakal
देश

अन्यथा उशीर होईल; राज्यसभेतील कामकाजाबाबत व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केली नाराजी

आज राज्यसभेतील 72 खासदार निवृत्त होत आहेत. त्यावेळी आयोजित निरोपसमारंभावेळी ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विविध विषयांवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे (Rajya Sabha) कामकाज अनेकवेळा तहकुब करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षात राज्यसभेचे कामकाजात विरोधकांमुळे महत्त्वाच्या वेळेपैकी तब्बल 35 टक्क्यांपेक्षा अधिकवेळा वाया गेला आहे, असे राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांनी सांगितले आहे. हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा असून, खूप उशीर होण्यापूर्वी याला आळा घालण्याची गरज आहे, असेदेखील नायडू यांनी सांगितले. आज राज्यसभेतील 72 खासदार निवृत्त झाले त्यावेळी त्यांना देण्यात येणाऱ्या निरोपसमारंभावेळी ते बोलत होते. (M Venkaiah Naidu On Rajya Sabha Working Culture)

यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते. अनुभवाला स्वतःचे खूप महत्त्व आहे. असे अनुभवी सोबती घर सोडून गेल्यावर घराचे व राष्ट्राचे मोठे नुकसान होते. म्हणूनच अनुभवी लोक निघून गेल्यावर इथे असलेल्यांची जबाबदारी आणखीनच वाढते, असे मत मोदी यांनी खासदारांच्या निरोपसमारंभाप्रसंगी व्यक्त केले.

या संसदेत आपण बराच काळ घालवला आहे. या सदनाने आपल्या जीवनात जेवढं योगदान दिलं, ते आपण सभागृहासाठी दिलेल्या योगदानापेक्षा जास्त आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून जमवलेला अनुभव सदस्यांनी देशाच्या चारही दिशांना नेला पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, उपसभापती हरिवंश आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत फोटो सेशन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT