Ayodhya Aug 5 PM at Ram temple event will be live on DD 
देश

राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरबसल्या पाहायल मिळणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात होणार असून, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. परंतु, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरू असून या कार्यक्रमाचं अयोध्येतून थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून केलं जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत असतील आणि संत, विश्वस्त व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी पूजा करतील, असं म्हटलं आहे.

या कार्यक्रमाविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत, असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं म्हटलं आहे.

दरम्यान, अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT