ganesh-pooja.jpg
ganesh-pooja.jpg 
देश

अयोध्येत पूजाविधीला सुरुवात; आज विघ्न दूर करणाऱ्या गणेशाची पूजा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पाश्वभूमीवर सोमवारपासून अयोध्येत पूजाविधी सुरु झाली आहे. सोमवारी मंदिरात गणेश पूजा करण्यात आली आहे. हिंदू संस्कृतीत कोणत्याही मोठ्या सोहळ्याची सुरुवात गणेश पूजेने केली जाते.

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्याची सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता 11 पुजाऱ्यांनी मंत्राचा जप करत पूजा सुरु केली. यावेळी अयोध्येतील इतर मंदिरांमध्ये 'रामायण पाठ' करण्यात आला.  

राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना; काँग्रेस नेत्याची मोदींना...

अयोध्या आज त्रेता युगासाठी जागा होत आहे. आज या पवित्र शहरामध्ये फक्त मंत्राचा जप, आरती, रामायण पाठ आणि घंटानाद ऐकायला येत होता. ही तीन दिवसाच्या पूजाविधीची सुरुवात असून भूमिपूजनाने आणि राम मंदिराच्या निर्माणाच्या सुरुवातीने ती संपेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक महंत सत्येंद्रा यांनी दिली. गणेशाची पूजा करणे या सारखा दुसरा शुभ प्रसंग असणार नाही. आता कोणत्याही अडथळ्याशिवाय राम मंदिर बांधून पूर्ण होईल, असं संत समितीचे महाराज कन्हैया दास म्हणाले आहेत. 

दरम्यान, अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.  या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने अयोध्यानगरीमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सर्वत्र ड्रोन कॅमेरांद्वारे नजर ठेवली जात असून बाहेरुन येणाऱ्यांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरु असलेला वाद सुटल्यानंतर राममंदिर उभारणीला वेग आला आहे. मंदिराचा आराखडा, खांब आणि इतर अनेक बाबी गेल्या अनेक वर्षांपासून तयारच होत्या. त्यामुळे हा सोहळा लाखोंच्या उपस्थित होण्याचा अंदाज होता. मात्र, कोरोनामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. मात्र, तरीही उत्तर प्रदेश सरकारने हा सोहळा भव्य करण्याचा चंग बांधला आहे.  

कोविड पॉझिटिव्ह अमित शहांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती अडवाणींची भेट

कार्यक्रमासाठी कोरोनासंदर्भात सर्व निर्बंधांचे पालन काटेकोरपणे केले जाणार असल्याने निमंत्रित व्यक्तींशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अयोध्येत बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याबरोबरच शहरातील पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरातील दुकाने मात्र खुली असणार आहेत.

(edited by-kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT