Tajmahal 
देश

ताजमहालमध्ये पूजा करण्यासाठी निघाले अयोध्येतील महंत!

ताजमहाल हा तोजोमहल असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आग्र्याच्या जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये भगवान शंकराची पूजाअर्चा करण्याची घोषणा अयोध्येतील महंत परमहंस दास यांनी केली होती, त्यासाठी मंगळवारी ते आग्र्याकडे रवाना झाले. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं. महंत दास यांचं म्हणणं आहे की, ताजमहाल हा तेजोमहल आहे. (Ayodhya mahant Paramsans Das going to worship at Agra Taj Mahal)

महंत परमहंस दास २६ एप्रिल रोजी आग्र्याला गेले होते. यावेळी त्यांनी ताजमहालात नियमबाह्य प्रवेश केल्यानं त्यांना तिथं रोखण्यात आलं. यावर तपस्वी छावणीचे महंत असलेल्या दास यांनी आपल्या अंगातील भगवी वस्त्रं आणि धर्म दंडामुळं ताजमहालात जाण्यापासून रोखण्यात आलं. तसेच मुस्लिमांच्या इशाऱ्यावर ताजमहालाच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला वाईट वागणूक दिली. यावेळी आमच्या सहकाऱ्यांकडील फोन हिसकावून घेत त्यातील फोटो आणि व्हिडिओ देखील डिलीट करण्याचा आरोप त्यांनी केला होता.

महंत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी म्हटलं की, सुरक्षा चौकशीत महंत यांना धर्मदंड लॉकरमध्ये ठेऊन पुन्हा घेऊन जण्यास सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी हे मान्य केलं नाही, ते तातडीनं परत निघाले. त्यांच्या कपड्यांवर कुठलाही आक्षेप नव्हता. कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करुन ताजमहालमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

ताजमहालात धार्मिक आणि प्रसिद्धी कार्यक्रमांना बंदी

नियमानुसार, ताजमहालमध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिक आणि प्रसिद्धी विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. केवळ शुक्रवारी आणि ईदच्या दिवशीच इथल्या मशीदीमध्ये नमाज पठण केलं जात. शहाजहॉंचा ऊरुस असतो तेव्हा तीन दिवस या ठिकाणी प्रार्थनांचे कार्यक्रम होतात. आजच्या ईदच्या दिवशी दोन तासांसाठी इथं विनामुल्य प्रवेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT