Ayodhya Ram Mandir eSakal
देश

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष; कित्येक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश!

Ram Mandir Update : राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.

Sudesh

अयोध्येतील श्रीराम मंदिराखाली अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना या मूर्ती आढळल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मंदिराचे अवशेष

चंपत राय यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. मात्र, त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमधून हे एखाद्या मंदिराचे अवशेष असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये कित्येक मूर्ती आणि मंदिराचे स्तंभ दिसून येत आहेत.

राम मंदिरात येणाऱ्या भाविकांना हे पुरातन अवशेष पाहता येणार आहेत. यासाठी हे अवशेष एका विशेष गॅलरीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. सोबतच याबाबत अधिक माहिती देखील देण्यात येणार आहे. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कधी होणार प्रतिष्ठापणा?

श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा कधी होणार याबाबत जून महिन्यात अपडेट देण्यात आली होती. पुढील वर्षी १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली. साधारणपणे २४-२५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT