अयोध्या - अयोध्येत इतिहास घडत असताना अलौकिक क्षणाचा साक्षीदार बनलेले हे प्राचीन शहर सध्या उत्सवाच्या रंगात रंगले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शहरभर दिवाळीसारखे असलेले वातावरण कार्यक्रम संपला तरी कायम होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भूमिपूजन कार्यक्रमासाठी हनुमान गढीपासून ते मंदिरस्थळापर्यंतचा रस्ता झेंडूच्या फुलांनी दुतर्फा सजविण्यात आला होता. सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेडनाही फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. या मार्गावरील दुकानेही पिवळ्या रंगात रंगविण्यात आली होती. हनुमान गढीलाही रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून अयोध्या रंगांमध्ये न्हाऊन गेली आहे. शहरभर सर्वत्र लाइटच्या माळांचा झगमगाट, शरयू नदीच्या घाटावर पणत्या, लोकांमध्ये सळसळता उत्साह यामुळे अयोध्यानगरीचे रुपच पालटून गेले आहे.
‘राम की पौडी’ येथे प्रशासनाने लावलेल्या सव्वा लाख दिव्यांमुळे सर्वत्र दिवाळीचाच भास होत होता. गेल्या वर्षीही येथे दिवाळीच्या आदल्या दिवशी झालेल्या दीपोत्सवात साडे चार लाख पणत्या लावल्या होत्या आणि तो विश्वविक्रम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून शरयू तीरावरील ‘राम की पौडी’ लेझर लाइटच्या प्रकाशात झगमगत असून अयोध्यावासियांसाठी हा वेगळाच अनुभव आहे.
बांधकामासाठी प्रतीक्षाच
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन झाले असून मंदिराच्या बांधकामास उद्यापासून सुरूवात होणार असे रामभक्तांना वाटत असले तरी प्रत्यक्ष बांधकामासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण राम मंदिर आराखड्याचा नकाशा अद्याप मंजूर झालेला नसल्याचे ट्रस्टवरील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बांधकामास विलंब
कारागीर आणि मजूर
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.