Narendra Modi 
देश

Ayodhya : 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा; घरोघरी 'रामज्योती' पेटावी; PM मोदींचं आवाहन

अयोध्येत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

राम मंदिराच्या उद्घाटनदिनी २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करावी. तसेच घरोघरी रामज्योती पेटावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. अयोध्येत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी आयोजित सभेत मोदी बोलत होते. (Ayodhya Ram Mandir do Celebrate Diwali on January 22 light Ram Jyoti in every house says PM Modi)

२२ जानेवारीला सर्वांनी अयोध्येला येऊ नये - मोदी

सर्व देशवासियांना माझी आणखी एक प्रार्थना आहे की, प्रत्येकाची इच्छा आहे की २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला जावं. पण ते तुम्ही देखील जाणता की सर्वांना इथं येणं शक्य नाही. (Latest Marathi News)

अयोध्येत सर्वांचं येणं खूपच अवघड आहे. त्यासाठी देशभरातील रामभक्तांना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी २२ जानेवारी रोजी एकदा विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर २३ जानेवारीनंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येला यावं.

अयोध्येला २२ जानेवारीला जायचंच असं करु नका. प्रभू रामाला त्रास होईल असं आपण भक्त कधी करणार नाहीत. साडे पाचशे वर्षे आपण वाट पाहिली काही दिवस अजून वाट पाहुयात, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT