Ayodhya Ram Mandir History Sakal
देश

रावणाची लंका सोन्याची होती तर प्रभू श्रीरामाची अयोध्या कशी होती? जाणून घ्या प्राचीन ग्रंथात काय लिहिलंय?

Ayodhya Ram Mandir History: अयोध्या हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. अयोध्या ही घाट आणि मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे अयोध्येला धार्मिक महत्त्व आहे. अयोध्येला पूर्वी साकेत नावाने ओळखने जायचे.

सकाळ वृत्तसेवा

- आरती भुजबळ

Ayodhya Ram Mandir History: अयोध्या हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. अयोध्या ही घाट आणि मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे अयोध्येला धार्मिक महत्त्व आहे. अयोध्येला पूर्वी साकेत नावाने ओळखने जायचे. तेथे गुप्त व्दार घाट, कैकयी घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट प्रचलित आहे. अयोध्याची गणना हिंदू धर्मातील सात पवित्र स्थळांमध्ये केली जाते.

अयोध्येत अनेक प्राचीन वास्तु , मूर्ती आढळतात. तेथील प्रत्येक वास्तूला विशिष्ट पौराणिक कथा आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. हिंदु धर्मासोबत इतर धर्मांच्या पौराणिक नोंदी आपल्याला अयोध्येत आढळतात.

अयोध्या ही श्रीरामांसोबत जैन धर्मातील पाच तीर्थंकार ऋषभनाथ, अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतिनाथ आणि अनंतनाथ यांची जन्मभूमी आहे. तसेच गौतम बुध्द आणि महावीर हे सुध्दा येथे राहिले होते. अथर्ववेदात अयोध्येला देवांचे नगर असे संबोधले आहे. पौराणिक ग्रंथानुसार सूर्यपुत्र वैवस्वत मनु यांनी इ.स.पु. सुमारे ६६७३ साली शरयु नदीकाठी अयोध्येची स्थापना केली.

कोसला साम्राज्याची राजधानी म्हणून अयोध्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. मनु नंतर त्यांचे पुत्र इल, इक्ष्वाकु, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट, नरिष्यंत, करुष, महाबली, शर्याति आणि पृषध यांचे साम्राज्य होते. इक्ष्वाकु कुळातच रामाचा जन्म झाला. त्यांच्या जन्मावेळेस अयोध्येचे नाव अवध होते.

तुलसीदास यांनी रामचरितमानस ग्रंथामध्ये अयोध्येचे वर्णन समृध्द नगरी असे केले. तसेच या भूमीची तुलना स्वर्गाशी केली होती. शरयू नदीमध्ये स्नान केल्याने पाप कमी होते अशी धारणा आहे. त्यामुळे शरयू नदीला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे.

तसेच नदीकाठी तुळशीसह अनेक आयुर्वेदिक झाडे आयोध्याच्या रहिवाशांनी लावली होती. यामुळे अयोध्येचे वातावरण नेहमी आनंदी, सकारात्मक, प्रसन्न राहत होते.

वाल्मिकी यांनी रामायण या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली आहे. रामायणात २४००० श्लोकांचा समावेश असून रघुवंशाचा राजा श्रीरामांचा उल्लेख आढळतो. वाल्मिकी यांनी लिहिले होते की, अयोध्या ही धन-धान्यांनी परिपूर्ण नगरी होती. तसेच पूर्वीच्या काळात अयोध्येचे रस्ते स्वच्छ आणि सुंदर होते. चारीही बाजूंना फुलाफळांची वेगवेगळी झाडे लावलेली होती.

स्कंदपुराणामध्ये अयोध्येचे विस्तारित वर्णन केले आहे. स्कंदपुराणानुसार अयोध्या ही भगवान विष्णुंच्या सुदर्शनचक्रावर विराजमान आहे आणि यामुळे अयोध्याचा आकार माशासारखा दिसतो. अयोध्यामध्ये सुर्यवंशाच्या अनेक राजांचे शासन होते.

अगस्त्य ऋषि , वेद व्यास यांसारखे अनेक ऋषि येथे तपस्या करण्यासाठी येत असे. परंपरेनुसार अयोध्या दर्शनाची सुरूवात हनुमान गढी मंदिरापासुन होते. या मंदिरात हनुमान आपल्या आईच्या मांडीवर बसलेले आहेत अशी प्राचीन मृर्ती आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT