Ayodhya Ram Mandir sakal
देश

Ayodhya Ram Mandir : चांगल्या कार्यक्रमात विघ्न आणणे ही काँग्रेसची प्रवृत्ती; गैरहजर राहण्यावरून भाजपचा हल्लाबोल

अयोध्येतील २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमास गैरहजर राहण्याचा निर्णय सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी घेतला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अयोध्येतील २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमास गैरहजर राहण्याचा निर्णय सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी घेतला आहे. या मुद्द्यावरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार घालत कॉंग्रेसने आपल्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केली.

चांगल्यातल्या चांगल्या कार्यक्रमात विघ्न आणून त्याद्वारे आनंद मिळविण्याची कॉंग्रेसची प्रवृत्ती बनली आहे, असे सांगत त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेसने ज्या ज्या चांगल्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, त्याची यादी खूप मोठी आहे. या लोकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संसदेतील अभिभाषणावर बहिष्कार घातला होता.

२००४ ते २००९ या काळात काँग्रेसकडून कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकण्यात आला होता. मे १९९८ मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा दहा दिवसांपर्यंत काँग्रेसकडून मौन बाळगले गेले. या लोकांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला होता.

संसद भवनाचे उद्घाटन असो वा जीएसटी लागू करण्याचा ऐतिहासिक प्रसंग असो, त्यावेळीही काँग्रेसकडून बहिष्काराची भूमिका घेण्यात आली . जी-२० परिषदेवेळी जगातील सर्वात शक्तीशाली २० देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आले होते. त्यावेळी राष्ट्रपतींनी दिलेल्या स्नेहभोजनावरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता, असे त्रिवेदी म्हणाले. काही कट्टरपंथी लोकांच्या मतांसाठी काँग्रेसने अयोध्येचे निमंत्रण नाकारले आहे.

ही गांधींची नव्हे तर नेहरूंची काँग्रेस आहे, असा टोला त्रिवेदी यांनी मारला. केवळ लांगुलचालन राजकारण करण्यासाठी हिंदू परंपरा व मान्यतेला काँग्रेस विरोध करीत आहे. गेल्या ३०,४० वर्षात जेव्हा जेव्हा राम मंदिराचा विषय आला, तेव्हा एकतर या विषयावर काँग्रेसने टीका केली अथवा त्याचा विरोध केला, अशी टीका संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

‘अयोध्या मंदिराच्या कामात काँग्रेसने अडथळे आणले’

अयोध्येतील राम मंदिराच्या कामात काँग्रेसने सातत्याने अडथळे आणल्याचा आरोप भाजपचे खासदार हरनाथसिंह यादव यांनी केला. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास हजर राहून आपले पाप धुण्याची मोठी संधी काँग्रेससमोर होती. मात्र ही संधी स्वत:हून त्या पक्षाने गमावली आहे, असे यादव म्हणाले. तर अयोध्येला जाण्याची काँग्रेसवाल्यांची नैतिक ताकद नसल्याची टीका खासदार गिरिराज सिंह यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

Ranji Trophy 4th Round: विदर्भाचा दणदणीत विजय; तर महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या मयंक अगरवालचं शतक अन्...

Mumbai Local: लोकल वाहतुकीला मिळणार ‘ग्रीन कॉरिडॉर’! 'या' मार्गादरम्यानचे १० रेल्वे फाटक होणार बंद

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीमध्ये हायअलर्ट

Ajit Pawar: रुपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेची ऑफर; उद्या घेणार अजित पवारांची भेट, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT