Ayodhya Ram Mandir Inauguration High Court esakal
देश

श्रीराम सेनेची 'ती' याचिका High Court ने फेटाळली; परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी

अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा (Ayodhya Ram Mandir Inauguration) उत्साह देशभरात साजरा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून श्रीराम सेनेतर्फे (Sriram Sena) धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत तयारी केली होती.

बेळगाव : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा (Ayodhya Ram Mandir Inauguration) उत्साह देशभरात साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, पोलिस प्रशासन आणि उच्च न्यायालयाने (High Court) श्रीराम सेना (हिंदुस्थान) तर्फे सोमवारी (ता.२२) धर्मवीर संभाजी चौकातून निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

काही दिवसांपासून श्रीराम सेनेतर्फे (Sriram Sena) धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत तयारी केली होती. याबाबत प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज दाखल केला. मात्र, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत परवानगी देता येणार नाही, अशी माहिती रामसेनेला दिली होती. त्यामुळे रामसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शोभायात्रा काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. मात्र, इतर दिवशी शोभायात्रा काढण्यासाठी परवानगीचा अर्ज करावा, त्या दिवशी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. शोभायात्रा काढण्यासाठी परवानगी नसल्याचे पत्र सरकारी वकिलांनी राज्य गृह विभागाच्या सचिवांसह बेळगाव पोलिस आयुक्त व उपायुक्तांना पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT