देश

Ayodhya Ram Mandir Inauguration: आज राम मंदिराचे लोकार्पण; प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त ठरला! दिवसभराचा कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir Inauguration: भारतीयांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो दिवस आज आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच राम लल्लाची प्रतिष्ठापणा होईल.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीयांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो दिवस आज आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच राम लल्लाची प्रतिष्ठापणा होईल. अयोध्येमध्ये जवळपास आठ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. सोहळा भव्य होईल अशी तयारी करण्यात आली आहे. आज नेमका कसा कार्यक्रम असेल ते जाणून घेऊया

अशी असेल अयोध्येतील राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा

- सकाळी १० वाजता देशातील विविध राज्यातून आलेल्या कलाकारांकडून पारंपरिक वाद्यांचे होणार मंगल वादन

- सकाळी १०.३० पर्यंत विशेष आमंत्रितांना रामजन्मभूमी स्थळापर्यंत दिला जाणार प्रवेश

- सकाळी ११.०५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार

- दुपारी १२.२० वाजता अभिजीत मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा. मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेच्या विधींना होणार सुरुवात

- 12 वाजून 29 मिनिट आणि 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद हा असणार ८४ सेकंद चा शुभ मुहूर्त

- १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत करणार छोटे भाषण

- दुपारी २ नंतर विशेष आमंत्रितांना करू दिले जाणार प्रभुरामांचे दर्शन

२१ आणि २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहे. केवळ निमंत्रितांना अयोध्येत प्रवेश दिला जात आहे. २३ तारखेपासून मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुले असेल. देशभरातील मान्यवर अयोध्येत पोहोचले आहेत. आता काहीच वेळात अयोध्येतील सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चौख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. माहितीनुसार, जवळपास १५ हजार सैनिक आणि पोलीस कर्मचारी अयोध्येमध्ये तैनात आहेत.

देशभरात कार्यक्रम

राम मंदिराचा लढा हा गेल्या पाचशे वर्षांचा संघर्ष असल्याची हिंदूंची भावना आहे. त्यामुळे अखेर आज मंदिर आपल्या ठिकाणी उभा राहत असल्याने लोकांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना आहे. त्यामुळे अयोध्येत येऊ न शकलेले रामभक्त देखील आपापल्या परिने उत्सव साजरा करत आहेत. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घराघरात दीपोत्सव केला जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT