Ayodhya Ram mandir Sakal
देश

Ayodhya Ram Mandir : निमंत्रितांना मिळणार मृदा, मोतीचूर लाडवांचा प्रसाद अन् धार्मिक ग्रंथांची भेट मिळणार

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांना या मंदिराचा पाया खोदताना काढण्यात आलेली माती बॉक्समधून भेट म्हणून देण्यात येईल.

पीटीआय

अयोध्या - अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांना या मंदिराचा पाया खोदताना काढण्यात आलेली माती बॉक्समधून भेट म्हणून देण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वतः पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार असून त्यांना अयोध्येतील राम मंदिराची पंधरा मीटरची प्रतिमा एका ज्यूट बॅगमधून भेट म्हणून देण्यात येईल.

या सोहळ्याला अकरा हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहणार असून त्यांना आकर्षक अन् अविस्मरणीय भेटवस्तू देण्यात येतील. या निमंत्रितांना प्रसाद म्हणून शंभर ग्रॅम वजनाचे मोतीचूरचे लाडू देण्यात येतील. शुद्ध तुपापासून या लाडवांची निर्मिती करण्यात आली आहे.

निमंत्रितांना भेट म्हणून दोन बॉक्स देण्यात येतील एकामध्ये प्रसादाचे मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान असेल तर दुसऱ्या बॉक्समध्ये माती असेल. शरयू नदीतील पाणी भरलेली एक बाटली देखील त्यांना देण्यात येईल. गीता प्रेस गोरखपूरकडून तयार केलेल्या ग्रंथांची एक प्रतही यावेळी देण्यात येईल.

मॉरिशसमध्ये दोन तासांची सवलत

पोर्ट लुईस - अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू असताना हिंदू धर्मीयांना प्रार्थना करता यावी म्हणून मॉरिशस सरकारने सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याची घोषणा आज केली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून विशेष प्रसारण देखील करण्यात येईल. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन ते चार अशी ही सवलत देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT