ayodhya ram mandir prana pratishtha pm narendra modis 11 days fast esakal
देश

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेपर्यंत पंतप्रधानांचा उपवास; व्रताच्या नियमांनुसार दैनंदिन कार्यक्रम

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबद्दल देश-विदेशातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझे हृदय भरून आल्याचे त्यांनी आज सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिरात होणाऱ्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ११ दिवस, म्हणजे आजपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास व्रताचे पालन करणार आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबद्दल देश-विदेशातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझे हृदय भरून आल्याचे त्यांनी आज सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी एक ऑडिओ संदेश ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. ‘‘प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा माझ्यासह देशातील १४० कोटी लोकांच्या श्रद्धेची पूर्तता आहे. अयोध्येतील या सोहळ्याला अवघे ११ दिवस उरले आहेत.

या काळात उपवास व्रत करणार असून या व्रताच्या नियमांनुसारच दैनंदिन कार्यक्रम आखणार आहे,’’ असे मोदींनी संदेशात म्हटले आहे. ‘मागील ५०० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षांची परिपूर्ती पाहण्याचे भाग्य मला मिळाले आहे.

गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्याच्या येणाऱ्या क्षणामुळे मी रोमांचित झालो आहे. ही केवळ निमित्तमात्र असून माझ्या माध्यमातून देशातील तमाम लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत,’ असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

यावेळी त्यांनी राममंदिराच्या संघर्षामध्ये अनेकांनी दिलेल्या बलिदानाचाही उल्लेख केला. अनेक अनभिज्ञ लोकांनी या राममंदिराच्या संघर्षात आपले योगदान दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राजमाता जिजाऊंचे स्मरण

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आज येण्याच्या काही तास आधी प्रसिद्ध झालेल्या संदेशात त्यांनी काळाराम मंदिर, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदाचे स्मरण केले. व्रताची सुरुवात करताना आपण आज नाशिकमध्ये असणे हा योगायोग असल्याचे ते म्हणाले.

‘‘वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी बराच काळ या परिसरात व्यतीत केला आहे. अशा या पुनीत भूमीमध्ये आज माझी उपस्थिती राहणार आहे. आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे. माँ जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांसारख्या महामानवाला जन्म दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या भूमीत येऊन जिजाऊंचे स्मरण करताना आनंद होत आहे,’’ असे मोदींनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Conflict : अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला, इंधन दराचा भडका उडणार? कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

IND vs NZ 1st ODI: उद्या पहिला वन डे सामना अन् एक, दोन नव्हे, तर सहा खेळाडूंची माघार; दुखापतीच्या ग्रहणाने संघ अडचणीत, भारत...

Jaykumar Gore Victory : सातारा जिल्हा बँकेत पुन्हा एकदा 'जय हो'! माण सोसायटी मतदारसंघात जयकुमार गोरेंचा मोठा विजय; विरोधकांचा दारूण पराभव

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस-आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी

European Roller: मेळघाटच्या जंगलात युरोपियन पाहुणा;निळ्या पंखांच्या सौंदर्याने पक्षिप्रेमी भारावले, जैवविविधतेत भर

SCROLL FOR NEXT