Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir sakal
देश

Ayodhya Ram Mandir : ‘रामोत्सव’निमित्त अयोध्येत कार्यक्रमांची धूम

शरत प्रधान

लखनौ - अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची संख्या निम्म्यावर आली असली तरी दररोज सुमारे दोन लाख रामभक्त दर्शनासाठी येत आहेत. अयोध्येत भाविकांचा ओढा कायम राहावा, यासाठी तेथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन करीत आहे. यासाठी ‘रामोत्सव’चे आयोजन केले आहे.

रामजन्मभूमीत रामजन्माचा सोहळा साजरा करण्याची संधी ‘रामोत्सव’नुळे मिळणार आहे. हा उत्सव मकरसंक्रापासून सुरू झाला आहे. रामनवमीला म्हणजे १७ एप्रिलला त्याची सांगता होणार आहे. यातील पहिला टप्पा राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंत (२२ जानेवारी) होता. आता ‘रामोत्सवा’ला गती देण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश पर्यटन मंडळाने रामनवमीपर्यंत अयोध्येत कार्यक्रमांची धूम उडविली आहे. ‘श्रीरामाच्या जन्मस्थानी पार पाडणाऱ्या मुख्य विधींचा अविभाज्य भाग,’ असे रामोत्वसाचे वर्णन करण्यात आले आहे.

कथाकथन, नृत्य-नाटिका

विविध कलाकारांच्या रामलीलेचे सादरीकरण हेही या कार्यक्रमाचा एक भाग आहे. देशभरातील कलकारांबरोबरच इंडोनेशिया, थायलंड आणि कोरिया आदी देशांमधील कलाकार यात सहभागी होणार आहेत. रामकथेचे पारायण निरंतर सुरू राहणार आहे. देशभरातील विविध प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांमधील प्रमुख कलाकार सादरीकरणासाठी तुकडी-तुकडीने येणार आहेत.

साहित्य संमेलन आणि कवी संमेलनांचे आयोजनही करण्यात येणार आहे. प्रख्यात नाट्यकर्मींच्या कार्यक्रमांमधून भारतीय संस्कृती आणि वारसा यांचे दर्शन होणार आहे. नामवंत कथाकारांचे कथाकथन हे या दीर्घ कार्यक्रमांच्या मालिकेतील एक प्रमुख वैशिष्ट्य असेल. वाद्य वादन आणि गायनाच्या मैफलीदेखील नियमित होणार आहेत.

निवडणूक लक्ष्य

देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून नृत्य कलाकार उत्सवात भाग घेणार असून त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे. अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुका‘रामोत्सव’च्या तोंडावर जाहीर होण्याची शक्यता असून हा योगायोग मानता येणार नाही. अयोध्येत सतत विविध उपक्रम सुरू ठेवण्याच्या कल्पनेतून सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य निश्चितच समजू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT