Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ayodhya Ram Mandir : मंदिरातील गर्दीचे नियोजन कसे करायचे ? अयोध्येतील ट्रस्ट घेणार तिरूपती मंदिराचा आदर्श !

अयोध्येमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या नवीन मंदिरात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित करण्यात आली.

Monika Lonkar –Kumbhar

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अयोध्येतील नवीन मंदिरात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर, आता अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

अयोध्येतील या वाढत्या गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तिरूमला तिरूपती देवस्थानम (TTD)द्वारे राबवण्यात येणाऱ्या व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचा आणि नियोजनाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. तिरूमला येथील बालाजी मंदिरात वर्षभरात दररोज सरासरी ६० हजार भाविक भेट देतात.

तिरूमला तिरूपतीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना तासंनतास रांगेत उभे रहावे लागते. या रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना कोणतीही अडचण न येता सुरळीतपणे दर्शनाचा लाभ घेता येतो. या सर्व भक्तांचे आणि गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी तिरूमला तिरूपतीच्या देवस्थान ट्रस्टला ओळखले जाते.

त्यामुळे, आता अयोध्येतील गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट तिरूमला तिरूपतीच्या ट्रस्टतर्फे राबवल्या जाणाऱ्या पद्धतींचा अभ्यास आणि अवलंब करणार आहे. त्यासाठी लवकरच अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टची एक टीम तिरूमला देवस्थानला रवाना होणार आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान, अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी तिरूमला तिरूपती देवस्थानम ट्रस्टचे अध्यक्ष भूमना करूणाकर रेड्डी यांच्याशी तिरूमला देवस्थान ट्रस्टच्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास आणि गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी तिरूपतीला भेट देण्याच्या योजनेवर चर्चा केली होती.

या सगळ्या मुद्द्यांना सहमती दर्शवल्यानंतर तिरूमला तिरूपती देवस्थानमच्या प्रमुखांनी त्यांना तिरूपतीला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यासोबतच तिरूपती देवस्थान ट्रस्टतर्फे अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

तिरूमला देवस्थानला दरवर्षी २.४ कोटी भाविक भेट देतात

विशेष म्हणजे तिरूमला तिरूपती मंदिराला दरवर्षी सुमारे २.४ कोटी भाविक भेट देतात. या मंदिराला रोज सरासरी ६० हजारांपेक्षा जास्त भाविक भेट देतात. इतर वेळी जसे की, वार्षिक ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी आणि इतर सणांच्या आणि सुट्ट्यांच्या काळात भाविकांची संख्या १ लाखांच्या वर जाते.

विशेष म्हणजे या सगळ्यात वाढत्या गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन आणि नियोजन तिरूमला तिरूपती देवस्थानतर्फे केले जाते. शिवाय, भाविकांना देखील योग्य प्रकारे दर्शनाचा लाभ घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT