Pran Pratishtha Ceremony eSakal
देश

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात; खास फोटो आले समोर

Ayodhya Ram Mandir Inauguration:अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या विधींना सुरूवात झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.

Sudesh

Ayodhya Ram Mandir : संपूर्ण भारतासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीरामभक्त ज्या क्षणाची प्रतिक्षा करत होते, तो क्षण आज आला आहे. आज दुपारी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडेल. यासाठीच्या आजच्या विधींना सुरूवात झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.

आजच्या या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार व्हीआयपींना आमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजेपासून मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी शुभ मुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

या मंदिरामध्ये आज सामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ तारखेपासून हे मंदिर सामान्यांसाठी खुलं असणार आहे. देशातील नागरिकांनी आज अयोध्येत येण्याऐवजी आपल्या घरीच दिवाळी साजरी करावी असं आवाहन यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT