ayodhya ram mandir  sakal
देश

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या तीनपैकी फक्त एका मूर्तीची होणार प्रतिष्ठापना; उरलेल्या दोन मूर्तींचं काय होणार?

अयोध्येमध्ये २२ तारखेला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रतिष्ठापनेसाठी तीन मूर्त्या घडवण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून दोन मूर्त्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

संतोष कानडे

नवी दिल्लीः अयोध्येमध्ये २२ तारखेला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रतिष्ठापनेसाठी तीन मूर्त्या घडवण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून दोन मूर्त्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अयोध्येत मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे धार्मिक विधी सुरु झालेले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीची बुधवारी रामजन्मभूमी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी मूर्तीचा गर्भागृहात प्रवेश होणार आहे. म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल.

अयोध्येतील राम मंदिरासाठी तीन कलाकारांनी तीन मूर्ती साकारल्या होत्या. राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने कर्नाटक येथील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड केली. २२ जानेवारी रोजी मंदिरातील गर्भागृहात याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.

इतर दोन मूर्तींपैकी एक कर्नाटक येथील भट्ट यांनी घडविली होती. तर दुसरी राजस्थानमधील सत्य नारायण पांडे यांनी घडविली होती. तिन्ही मूर्तींची उंची ५१ इंच इतकी आहे. ज्यामध्ये पाच वर्षांच्या प्रभू रामाला साकारलेलं आहे.

रामलल्लाच्या तिनही मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामथ यांच्या रेखाटनावर आधारित आहेत. त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला रामलल्लाचे पेन्सिल स्केच सादर केले होते. त्यावर आधारित मूर्तीची घडण करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT