Ram mandir 
देश

अयोध्येत लॉकडाउनजन्य परिस्थिती; बाहेरच्यांना प्रवेशबंदी

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्यदिव्य राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. नियोजित कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिस सज्ज झाले असून 3 ऑगस्टपासून अयोध्येच्या बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओळखपत्रकाशिवाय याठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. राम जन्मभूमीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रावणी पूर्णिमेच्या पर्वसंध्येला म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी बाहेरुन येणाऱ्या श्रद्धाळू व्यक्ती अथवा समूहाला अयोध्येत प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध 4 आणि 5 ऑगस्ट कायम ठेवण्यात येणार आहेत.  

पालिस सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव अयोध्या नगरीत बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी असेल. अयोध्याच्या परिसरात याची आतापासूनच तयारी सुरु असून याठिकाणी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. बाहेरुन येणारी वाहने आणि महामार्गावरील बसेसचीही तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या ओळख पत्राची चाचपणी देखील करण्यात येत आहे. अयोध्या सिटी सर्कलमध्ये येणाऱ्या लोकांचीही चौकशी सुरु असून सरकारी ओळखपत्र पाहूनच त्यांना सोडण्यात येत आहे.  

अयोध्येतील हॉटेल्स, धर्मशाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी साध्या वेशात पोलिस तैनात असून संशयास्पद हालचालींवर ते बारिक लक्ष ठेवून आहेत. 5 ऑगस्ट रोजी अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या राममंदिराचे भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राममंदिर विश्वस्त ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी कार्यक्रमाला बोलवण्यात आलेल्या पाहुणे मंडळींची यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. जवळपास 200 प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमी पूजन करण्यात येणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार ठरला! यशस्वी जैस्वाल नव्हे, तर २४ वर्षी ऑल राऊंडर झाला कॅप्टन

Liquor Price: राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून दारुच्या किंमती वाढणार; आता एका बाटलीसाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा नवे दर

Maha Shivratri 2026 Thandai Recipe: महादेवाला प्रिय असलेली 'थंडाई' बनवा घरच्या घरीच, लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

Seva Teerth inaugurates : पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलला! जाणून घ्या, 'सेवा तीर्थ' मधून मोदींनी कोणते निर्णय सर्वात आधी घेतले?

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष १८ तारखेला ठरणार

SCROLL FOR NEXT