Budget 2024 eSakal
देश

Budget 2024 Health: आता अंगणवाडी सेविका अन् आशा वर्कर्सनाही मिळणार 'आयुषमान भारत' योजनेचा लाभ; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये काय-काय केलं हे सांगण्यापासून केली.

Sudesh

Budget 2024 Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये काय-काय केलं हे सांगण्यापासून केली. त्यानंतर त्यांनी विविध घोषणांना सुरूवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं, की आयुषमान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे. यासोबतच अंगणवाडी मदतनीसांना देखील याचा लाभ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आयुषमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. यापूर्वी यामध्ये D1 ते D5 आणि D7 वंचित श्रेणीमधील नागरिकांचा समावेश करण्यात येत होता. मात्र, आता अंगणवाडी कर्मचारी आणि ASHA वर्कर्सनादेखील या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत.

आयुषमान योजनेत भारतातील कित्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर देखील उपचार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT