Azam Khan Allegations on police I as a criminal My city too Lucknow sakal
देश

मी गुन्हेगार म्हणून माझे शहरही तसेच? - आझम खान

पोलिसांवर आरोप करीत आझम खानचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांच्या पूर्वसंध्येस पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचा आमदार आझम खान याने केला आहे. मी गुन्हेगार आहे आणि मी ते मान्य करतो, पण म्हणून माझे रामपूर शहरही तसेच आहे का, असा सवाल त्याने केला. तुरुंगात असलेला आझम रामपूर सदर येथून विधानसभेवर निवडून आला आहे. त्याने रामपूरच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आझमगढच्या खासदारकीचा राजीनामा देत करहलमधून विधानसभेची निवडणूक लढवीत विजय मिळविला. यामुळे या दोन्ही जागी गुरुवारी मतदान होत आहे.

आझम म्हणाला की, मी रात्रभर जागाच आहे. पोलिसांनी बुधवारी अनेक लोकांना पोलिस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली. त्यांनी रामपूरमधील सपचे उमेदवार असीम राजा यांच्याशी गैरवर्तन केले. राजा गंज, कोतवाली आणि सिव्हिल लाइन्स अशा तीन पोलिस ठाण्यांत गेले. गंज ठाण्यातील पोलिस निरीक्षकाने सर्वांत जास्त उद्धट वर्तन केले. ते हिंसक बनले होते. रामपूरमध्ये भाजपने घनश्यामसिंह लोधी यांना उमेदवारी दिली आहे. ते नुकतेच पक्षात दाखल झाले आहेत. त्यांच्यासमोर आझम याचे समर्थक असीम यांचे आव्हान आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने येथे उमेदवार उभा केलेला नाही.आझमगढमध्ये तिरंगी लढत आहे. भाजपने प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते-गायक दिनेशलाल यादव `निरुहा‘ यांना पाचारण केले आहे. सपचे धर्मेंद्र यादव आणि बसपचे शाह आलम ऊर्फ गुड्डू जमाली हे रिंगणात आहेत.

पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे आता मतदानाची टक्केवारी कमी झाली तर त्याचा दोष प्रशासनाचा आणि सरकारचाही असेल. रामपूरमध्ये सर्वत्र जीप फिरत होत्या आणि त्यावरील सायरन वाजत होते. पैशाची देवाणघेवाण झाल्याचेही माझ्या कानावर आले आहे. हे लाजीरवाणे आहे. प्रशासन काहीही करू शकते, आम्हाला सहन करावे लागेल. मला जगायचे असेल तर मलाही भोगावे लागेल.

- आझम खान, सपचा आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान; नांदेड, लातूर जिल्ह्यांत कहर; सात जिल्ह्यांतील १३० मंडलांना दणका

ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

SCROLL FOR NEXT