West Bengal
West Bengal ANI
देश

बागडोगरा विमानतळावर विमानसेवा ठप्प; 21 उड्डाणं रद्द झाल्याने प्रवाश्यांची तारांबळ

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमधील बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Bagdogra International airport) विमानसेवा ठप्प झाली आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी खराब झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती मिळताच तातडीने 21 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या विमानतळाचे संचालक पी. सुब्रमणि यांनी यासंबंधित माहिती दिली आहे. ते म्हणाले, विमावतळावर धावपट्टीला समस्या आली आहे. यांसंदर्भात एटीसीकडून रात्री बाराच्या सुमारास फोन आला. यानंतर तात्काळ सात विमानांची उड्डाणे सकाळी उतरली आणि सकाळचे ऑपरेशन पार पडले. धावपट्टीच्या समस्येमुळे 21 उड्डाणे रद्द करण्यात आली. उद्यापासून ही उड्डाणे पुर्ववत होतील असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एका आठवड्यापूर्वीही बागडोगरा विमानतळाची धावपट्टी खराब झाल्याने विमानसेवा काही काळ ठप्प झाली होती. अचानक ठप्प झालेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी धावपट्टीचा काही भाग कोसळल्याने विमानसेवाही विस्कळीत झाली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बागडोगरा विमानतळ व्यवस्थापनाकडून धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण कराण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु एप्रिल महिना पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्याने धावपट्टीशी संबंधित दुरुस्तीचे काम एप्रिलऐवजी मे-जूनमध्ये करावे, असे आवाहन उत्तर बंगालच्या टूर ऑपरेटर्सकडून करण्यात आले होते.

दरम्यान, एका महिन्यापूर्वीच सरकारने पश्चिम बंगालला जाणाऱ्या उड्डाणांवर (विमान) सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी उठवली होती. याआधी राज्यसरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुंबईसह अनेक शहरांतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली होती. राजधानी दिल्लीसह विमानसेवाही बंद करण्यात आली होती. यामध्ये प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन राज्याने विमानसेवा दोन ऐवजी तीन दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT