Smriti Irani: वेटर म्हणून काम केलं, आता थेट मोदींच्या मंत्रीमंडळात

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य केले.
Smriti irani news
Smriti irani newsesakal

TV Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य केले. त्यात क्योकी सास भी कभी बहु थी या मालिकेचा सर्वाधिक वाटा होता. या मालिकेनं मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती (Bollywood Movies) मिळवली होती. त्यातून अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti irani) यांची सर्वप्रथम प्रेक्षकांना ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी काही चित्रपट आणि मालिकांमधील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता त्या मोदी सरकारच्या केंद्रीय (PM Narendra Modi) मंत्रीमंडळात कार्यरत आहे. उद्या त्यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. इराणी यांचा जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष आणि त्यांची राजकीय कारकीर्द यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.

आज स्मृती इराणी यांची जगभरात प्रभावशाली राजकीय महिला म्हणून ओळख आहे. त्यांची सोशल मीडियावरही लोकप्रियताही मोठी आहे. त्यांचा फॉलोअर्सही लाखोंच्या संख्य़ेत आहे. त्या नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असतात. टीव्ही मनोरंजन विश्वातून सर्वप्रथम स्मृती इराणी यांनी चाहत्यांशी संवाद साधला. त्या कौटूंबिक मालिकेनं त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. ती आजतागायात कायम आहे. त्यांचा जन्म 23 मार्च 1976 सालचा. टीव्ही सीरियल आतिशपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती क्योकी की सास भी कभी बहु थी या मालिकेपासून. त्यात त्यांनी तुलसीची भूमिका साकारली होती. जी चाहत्यांना कमालीची भावली होती.

Smriti irani news
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

मनोरंजन विश्वामध्ये चमकण्यापूर्वी स्मृतीजींचा प्रवास फार संघर्षमय होता. त्यांनी त्याला सामोरं जात आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्मृती यांनी चाइल्ड ऑक्जिलियम स्कुलमधून बारावीपर्यतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी पत्रकारिता शिकण्यासाठी दिल्ली विश्वविद्यालायतही प्रवेश घेतला होता. त्यानंतर वडिलांची मदत आणि स्वताचे शिक्षण स्वताच्या पैशांवर पूर्ण करण्याच्या इराद्यानं काही काळ एका हॉटेलमध्ये वेटरचीही भूमिका केली होती. त्यानंतर त्यांना कुणा एका व्यक्तीनं मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला ऐकून त्या दिल्लीवरुन मुंबईला आल्या. 1998 मध्ये स्मृती यांनी मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यत धडक मारली होती. त्याच वर्षी मिका सिंगचा सावन में लग गई मधील बोलिया गाण्यात त्यांनी भूमिका केली होती. त्याच वेळी त्यांना एकता कपूरची मालिका मिळाली. त्यापुढील त्यांचा प्रवास स्वप्नवत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com