Bageshwar Dham Dhirendra Shastri esakal
देश

Bageshwar Dham : बागेश्वर धाममधला धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

'रामचरितमानस'विरोधात बोलणारे समाजासाठी कॅन्सर आहेत, असं विधानही त्याने केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बागेश्वर धाममधील कथित धर्मगुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच लग्न करणार आहे. त्याने स्वतःच याविषयी विधान केलं आहे. तसंच 'रामचरितमानस'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक हे समाजासाठी कॅन्सर आहे, असंही तो म्हणाला आहे.

अमर उजालाने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धीरेंद्र शास्त्रीने आपल्या लग्नाबद्दलही खुलासा केला आहे. आपण लवकरच लग्न करणार असल्याचं धीरेंद्र शास्त्रीने सांगितलं. लहानपणापासूनच त्याने कोणाच्याही प्रेमात पडण्याला साफ नकार दिला. वयाच्या ११ व्या वर्षाापासूनच आपण सनातन धर्माच्या प्रेमात पडल्याचं त्याने सांगितलं.

'रामचरितमानस'वर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडणं असं आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाला. असे आरोप करणाऱ्यांना लगेच लोकप्रियता हवी आहे. अशा लोकांचा बंदोबस्त करायचा असेल तर किम जोंग उनने कोरोनापासून वाचण्यासाठी जो मार्ग अवलंबला, तोच स्विकारायला हवा.

'रामचरितमानस'वर प्रश्न उपस्थित करणारे समाजासाठी कॅन्सर आहेत. त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाला आहे. तसंच अशा लोकांना देशाच्या बाहेर पाठवण्याची मागणीही त्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT