Bageshwar Dham’s Dhirendra Shastri collapsed during the Sanatan Ekta Padyatra as followers rushed to assist him.
esakal
Bageshwar Dham’s Dhirendra Shastri collapsed during the Sanatan Ekta Padyatra : बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन एकता पदयात्रेचा आज सातवा दिवस आहे. ही यात्रा दिल्ली आणि हरियाणा मार्गे आज मथुरेत पोहचणार आहे. दरम्यान बाबा बागेश्वर अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तरप्रदेश – हरियाणा बॉर्डरवर त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती, मात्र तेवढ्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या भक्तांनी त्यांना सावरले. मफलरने हवा दिली गेली, पाणी पाजलं. यानंतर मग थोडावेळाने बाबा बागेश्वर हे उठले. शिवाय, त्यांनी लोणचं आणि पराठे खाल्ल्याचीही माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे बुधवारी देखील त्यांना फार ताप होता. मात्र औषधी घेऊन थोडावेळ आराम केल्यानंतर त्यांनी पदयात्रा सुरू ठेवली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या भक्तांना त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी वाटत आहे.
ही सनातन एकता पदयात्रा मथुरेत चार दिवसात जवळपास ५५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यासाठी कडेकोड सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. एसएसपी अनुज चौधरी स्वत: बारकाईन यामध्ये लक्ष देत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर धीरेंद्र शास्त्रींची सुरक्षा वाढवली गेली आहे. सध्या सुरू असलेल्या पदयात्रेत धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत जवळपास एक लाख भाविक चालत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.