Ratnlal Sakal
देश

प्राध्यापक रतनलाल यांना जामीन मंजूर

उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकांनीही निदर्शने केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाबाबत वादग्रस्त ट्विट केल्याने अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक रतनलाल यांना शनिवारी सायंकाळी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विट केले होते आणि त्यावरून खूप टीका झाली. त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध विनीत जिंदाल या वकिलाने तक्रार केली होती.

यादरम्यान हिंदू महाविद्यालयात अध्यापन करणारे प्रा. रतनलाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना पुढे आल्या. उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकांनीही निदर्शने केली. यावेळी त्यांनी रतनलाल यांना जामीन न मिळाल्यास शिक्षण मंत्रालयासमोर (शास्त्री भवन) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दिल्ली पोलिसांनी रतनलाल यांना आज न्यायालयासमोर हजर केले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. रतनलाल यांना दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने मॉरीसनगर येथील निवासस्थानातून अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT