Lalu Prasad Yadav 
देश

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव पुन्हा तुरुंगात? जामीन रद्द करण्यासाठी CBI गेली सुप्रीम कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

Bail To Lalu Prasad Yadav In Fodder Scam Cases Challenged By CBI

पाटणा- लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चारा घोटाळ्याप्रकरणात लालू यादव जामीनावर बाहेर आहेत. सीबीआयने त्यांच्या या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीये. कोर्ट २५ ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी करणार आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना दिलासा मिळतो की त्यांना पुन्हा तुरुंगवारी घडते हे पाहावं लागेल.

झारखंड हाय कोर्टाने चार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला होता. हाय कोर्टाच्या या आदेशाप्रकरणी सीबीआय सुप्रीम कोर्टात आव्हान देत आहे. चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव तुरुंगात गेले आहेत. ९५० कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. प्राणी पालन विभागाकडून खोटी कागदपत्रे जारी करुन हा घोटाळा करण्यात आला होता.

मागील महिन्यात, सीबीआयने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि त्यांचा मुलगा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात जमीन-रोजगार घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयचा आरोप आहे की, लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना (२००४-२००९) रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात यादव कुटुंबाला जमिनी स्वस्तात किंवा गिफ्ट म्हणून देण्यात आल्या होत्या.

लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनी विरोधकांची आघाडी उभी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी १६ विरोधी पक्षांची बैठक २३ जून रोजी घडवून आणली होती. त्यानंतर आणखी एक बैठक १७-१८ जुलैला बंगळुरु येथे झाली होती. याठिकाणी विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असं नाव ठेवण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT