Monu Manesar 
देश

Haryana Violence: हिंसाचारामागं बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं हेटस्पीच! कोण आहे मोनू मानेसर?

मोनू मानेसरच्या एका व्हिडिओनंतर ही सर्व प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Haryana Violence: मणिपूरनंतर आता हरयाणामध्ये हिंसाचार भडकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नूह येथील विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या एका धार्मिक यात्रेनंतर या प्रकाराला सुरुवात झाली.

पण या हिंसाचारामागं बजरंग दलाचा कार्यकर्ता आणि गोरक्षक मोनू मानेसर (खरं नाव मोहित यादव) याचा एक भडकाऊ व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. (Bajrang Dal worker behind violence in Haryana Who is Monu Manesar)

हरयाणाच्या नूह इथं सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्यावतीनं ब्रिजमंडल जलाभिषेक शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेदरम्यान हिंसा भडकली होती, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारची शस्त्रे आणण्यास पोलिसांनी बंदी घातली होती.

तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात भिवानी इथं जुनैद आणि नासिर नामक दोन जणांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मोनू मनेसर हा आरोपी आहे. या प्रकरणावर एक स्टेटमेंट देणारा व्हिडिओ त्यानं व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ठेवला होता. त्यानंतर नूहच्या यात्रेदरम्यान हिंसा भडकली. (Latest Marathi News)

पण मोनू मनेसरच्या या व्हिडिओचं समर्थन बजरंग दलानं केलं आहे. मोनूनं फक्त एक व्हिडिओ पोस्ट केला होत त्यामुळं लोकांमध्ये संताप व्हायची गरज काय होती? असं म्हटलं आहे. तसेच हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी देखील मोनू मनेसरचा या हिंसाचारात सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

कोण आहे मोनू मनेसर?

मोहित यादव ऊर्फ मोनू मानेसर (वय २८) हा हरयाणातील गुरुग्राम येथील मानेसर इथला रहिवासी आहे. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असून गोरक्षक म्हणून तो काम करतो. त्याचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही असल्याची माहिती अमर उजालानं आपल्या वृत्तात दिली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

मोनू मानेसर हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्यानं भिवानी इथं झालेल्या दोघांच्या हत्येसंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या या व्हिडिओला विरोधही झाला होता तसेच त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला होता.

मोनू मानेसरचे फेसबूकवर सुमारे ८३ हजार आणि युट्यूबवर २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तो सोशल मीडियावर बऱ्याचदा गोरक्षेच्या कामाच्या पोस्ट करत होता.

हरयाणातील सध्याची स्थिती काय?

नूहं इथल्या हिंसाचारात अत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ होमगार्ड आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य पोलिसांच्या २० कंपन्या आणि सीआरपीएफची २० कंपन्या तैनात होत्या. यामध्ये आत्तापर्यंत ११६ लोकांना अटक करण्यात आली आहे. माझी जनतेला विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी, असं आवाहन हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT