Ban on old vehicles lifted Ban on old vehicles lifted
देश

जुन्या वाहनांवरील बंदी हटवली; या राज्याचा चालकांना दिलासा

सकाळ डिजिटल टीम

दहा वर्षे जुन्या डिझेल आणि पंधरा वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवरील बंदी उठवल्याची (Ban on old vehicles lifted) मोठी बातमी आहे. या बंदीच्या कक्षेत येणाऱ्या वाहनधारकांना सरकारने दिलासा दिला आहे. वास्तविक हा दिलासा हरियाणा सरकारने दिला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतेच सांगितले होते की, दहा वर्षे जुन्या डिझेल आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी फक्त गुरुग्राममधील वाहनांवर लागू करण्यात आली आहे आणि इतर कोठेही लागू नाही. सरकारने यासंदर्भात ऑटो चालक संघटनांशी आधीच चर्चा केली. (Ban on old vehicles lifted)

मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) म्हणाले की, सरकारने इतर कोणत्याही शहरातील जुनी वाहने हटविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. एनसीआर सीमेमध्ये येणाऱ्या इतर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार एका योजनेवर काम करीत आहे. कर्नालला एनसीआरमधून बाहेर काढणे ही लोकांची प्रदीर्घ प्रलंबित मागणी होती. राष्ट्रीय राजधानीच्या शंभर किमी परिघात मर्यादित करून एनसीआरची पुनर्व्याख्या केली जाईल.

दिल्लीत (delhi) जुन्या वाहनांवर बंदी अजूनही कायम आहे. याठिकाणी शासन किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाही. NGT ने दिल्लीत १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल (petrol) वाहनांवर बंदी घातली आहे. ही वाहने जंक होण्यापासून वाचवण्यासाठी दिल्ली सरकारने देशातील इतर शहरांमध्ये रेट्रो फिटमेंट आणि वाहनांच्या नोंदणीसाठी एनओसी मिळविण्याचा पर्याय दिला आहे. ज्या शहरांमध्ये या वाहनांना बंदी नाही, तेथे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करता येईल.

नवीन कार खरेदीवर पाच टक्के सूट

१० ते १५ वर्षांच्या कालावधीनंतरही वाहन मालकाला वाहन वापरायचे असेल, तर त्याला वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. या फिटनेस चाचणीत वाहन अपयशी ठरल्यास ते स्क्रॅप केले जाईल. जर तुम्ही जुने वाहन स्क्रॅप करत असाल तर नवीन कार खरेदी केल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यास ग्राहकांना ५ टक्के सूट मिळेल. याशिवाय नवीन वाहनाची नोंदणी देखील माफ केली जाईल. जे सुमारे ५०,००० रुपये आहे. जर तुम्ही पाच लाखांची कार खरेदी करीत असाल तर पाच टक्के दराने २५,००० रुपयांची सूट मिळेल. तुमच्याकडे स्क्रॅप प्रमाणपत्र असल्यास नवीन कारमधून एकूण ७५,००० रुपये मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT