RBI Sakal
देश

सहकारी बँकांच्या एमडी आणि संचालकपदी लोकप्रतिनिधींना बंदी

विनायक होगाडे

मुंबई : शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या नागरी सहकारी बँकांमधील व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्णवेळ संचालक या पदांवर संसद, विधीमंडळ सदस्य किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य वा अन्य सहकारी बँकांचे किंवा पतसंस्थांचे संचालक या व्यक्तींना अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी हे निर्बंध लागू राहणार नाहीत. त्यामुळे सहकारी बँकांच्या अध्यक्षपदावर राजकारणी राहू शकतील. अर्थात बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी या नव्या निर्बंधांना विरोध केला असून त्यांची आवश्यकता नव्हती, असे सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने नुकतेच यासंदर्भात परिपत्रक जारी करून हे नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक व पूर्णवेळ संचालक या पदांवर आता आमदार, खासदार, नगरसेवक आदी राजकारण्यांना राहता येणार नाही व या पदावर राजकारण्यांची नवी नियुक्तीही करता येणार नाही. मात्र शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या नागरी सहकारी बँकांनाच हे निर्बंध लागू होणार आहेत.

या पदावरील व्यक्तींकडे आता वित्तीय क्षेत्रातील किंवा सनदी लेखापालाची वा आर्थिक व्यवस्थापनाची अथवा सहकार व्यवस्थापन विषयाची पदवी-पदविका असावी, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हे पद जास्तीत जास्त पंधरा वर्षेच भूषविता येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे. अशी व्यक्ती अन्य कोणताही व्यवसाय करीत नसावी, इतर कंपन्यांची संचालक वा भागीदार नसावी, गुन्हेगार-वेडा-दिवाळखोर जाहीर झालेली नसावी अशाही अटी आहेत. तसेच त्यांना विशिष्ठ नमुन्यातील हमीपत्रेही भरून द्यावी लागतील.

सामान्यतः सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक (किंवा सीईओ) या पदावर तज्ञ व्यक्तीच नियुक्त केलेल्या असतात. ते सामान्यतः बँकिंग किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ वरिष्ठ अधिकारीच असतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे हे नियम अर्थहीन आहेत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले. तसेच सहकारी बँकांवर राजकारणी नकोत असा नियमही चुकीचा आहे, कारण राजकारणीही उच्चशिक्षीत असतात, असेही ते म्हणाले. तर या नव्या निर्बंधांनंतर देखील अध्यक्ष-उपाध्यक्षपदी राजकारणी व्यक्ती राहू शकतील, असे बँक कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी देवीदास तुळजापूरकर म्हणाले. रिझर्व बँकेचे नवे नियम केवळ पगारी व्यवस्थापकीय संचालक किंवा पगारी पूर्णवेळ संचालकांना लागू आहेत. निवडून येणाऱ्या राजकारणी संचालकांना हे नियम लागू राहणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: भाजप-शिंदे गटात श्रेयवादावरून संघर्ष

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

SCROLL FOR NEXT