Mulayam Singh Baberu
Mulayam Singh Baberu esakal
देश

बलात्कार-खुनाच्या खोट्या खटल्यात तरुणानं 12 वर्षे काढली तुरुंगात

सकाळ डिजिटल टीम

तुरुंगातून मुलाच्या सुटकेसाठी संपूर्ण कुटुंब बराच काळ वाट पाहत होतं.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा इथं बलात्कार आणि खुनाच्या खोट्या खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या एका व्यक्तीला तब्बल 12 वर्षांनंतर न्याय मिळालाय. न्यायालयानं त्याला निर्दोष मुक्त केलंय. मुलायम सिंह बबेरू (Mulayam Singh Baberu) यांना दोषी सिद्ध करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत, असं न्यायालयानं म्हटलंय.

मुलायम यांची न्यायालयातून (Court) निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, त्यांना एका महिलेनं बलात्कार आणि हत्येच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. न्यायालयानं त्याला निर्दोष सिद्ध करून तुरुंगातून मुक्त केलंय. लीगल अॅण्ड डिफेन्स कौन्सिल सिस्टीम कमिटीमध्ये सामील असलेले वकील मूलचंद कुशवाह यांनी मुलायम सिंह बबेरू याची कोर्टात मजबूत बाजू मांडली, त्यामुळं त्याची मुक्तता करण्यात आलीय.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, विशेष न्यायाधीश एससी-एसटी अॅक्टचे मोहम्मद कमरुज्जमा खान यांनी सोमवारी शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. 42 पानांच्या निकालात न्यायमूर्तींनी पोलीस या प्रकरणात ठाम राहू शकत नाहीत, अशी टिप्पणी केलीय. 12 वर्षांनंतर निर्दोष सिद्ध झाल्यानंतर मुलायम आता व्यवस्थेविरोधात लढा देत हक्क मागणार आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर मुलायम काकासोबत मध्य प्रदेशातील छतरपूरला गेले आहेत. त्यानंतर तो उत्तर प्रदेश सोडून मध्य प्रदेशात राहणार आहे.

तुरुंगातून मुलाच्या सुटकेसाठी संपूर्ण कुटुंब बराच काळ वाट पाहत होतं. पोलिसांच्या कारवाईमुळं होरा गावातील मुलायम सिंह यांचं बालपण तर गेलंच, पण तरुणपणाची अनेक वर्षे त्यांना तुरुंगात काढावी लागली. गरिबीमुळं त्यांचं शिक्षण आधीच थांबलं होतं. मात्र, तो पालकांचा आधार बनण्याऐवजी त्यांच्यावर ओझं बनला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं कुटुंबाला त्याला सावरताही आलं नाही. अल्पवयीन असल्यानं तो प्रथम बालसुधारगृहात राहिला. प्रौढत्वात येताच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तो वेळोवेळी स्वतःला निर्दोष ठरवत राहिला, पण त्याच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT