S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India esakal
देश

Bangladesh Violence: बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिली माहिती

बांगलादेशमध्ये सध्या राजकीय आरिष्ट्य आलं असून पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडला असून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. तसंच या देशात सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. नव्या काळजीवाहू सरकारची इथं स्थापना होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय आरिष्ट्य आलं असून पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडला असून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. तसंच या देशात सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. नव्या काळजीवाहू सरकारची इथं स्थापना होणार आहे. पण इथं मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक अडकून पडले आहेत. नेमका हा आकडा किती आहे? याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली.

बांगलादेशातील परिस्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत याबाबत निवदेन दिलं. त्यांनी सांगितलं की, भारत आणि बांगलादेशात अल्पसंख्यांकांबाबत नजर ठेवली जात आहे. आपल्या राजकीय मिशनद्वारे आम्ही तिथल्या भारतीय समुदायाच्या संपर्कात आहोत. शेजारील देशात या जटिल आणि सातत्यानं अस्थिर परिस्थितीनुसार सीमा सुरक्षा बलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

शेख हसीनाच्या भारतात येण्यावर काय म्हणाले?

संसदेत दिलेल्या निवेदनावर जयशंकर म्हणाले, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतात दाखल होण्यावर भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताला खूपच कमी वेळात माहिती देत त्यांचं भारतात दाखल होण्यावर जयशंकर म्हणाले, ५ ऑगस्ट रोजी आंदोलक कर्फ्यु लावल्यानंतरही ढाक्यात एकत्र आले.

सुरक्षा संस्थांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खूपच कमी कालावधीच्या नोटिशीनंतर भारतात आश्रयासाठी येण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. बांगलादेशच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला हसिना यांच्या उड्डाणाची मंजुरी मिळाली. त्यानंतर त्या काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचल्या.

किती भारतीय बांगलादेशात अडकले?

जयशंकर यांनी सांगितलं की, बांगलादेशात १९,००० भारतीय नागरिक असल्याचा अंदाज आहे. यांपैकी ९००० हे विद्यार्थी आहेत. यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे जुलै महिन्यात भारतात परतले आहेत. पण बांगलादेशातील भारतीय नागरिकांच्या आम्ही राजकीय मिशनच्या माध्यमातून संपर्कात आहोत. इथं अल्पसंख्यांक नागरिकांची स्थिती कशी आहे, आबाबतही आम्ही माहिती घेत आहोत.

भारतावर काय परिणाम होणार?

जयशंकर यांनी सांगितलं की, बांगलादेशसोबत भारताचे दशकांपासून चांगले संबंध आहेत. तिथल्या परिस्थितीमुळं ही चिंता देखील व्यक्त केली जात आहे. जून महिन्यापासून तिथं परिस्थिती बिघडायला लागली आहे. आत्तापर्यंत ही परिस्थिती कायम आहे. बांगलादेशात जे काही झालं ते केवळ पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सेवा, करुणा आणि अध्यात्माचा दीप मावळला; जैन धर्मातील पहिल्या महिला आचार्य चंदनाजी यांचे निधन

Pune Crime : आंबेगाव, कोंढवा, मुंढवा परिसरात किरकोळ वादातून मारहाण; तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल

Mumbai: कोस्टल रोडचा खर्च वाढता वाढे! सातव्यांदा बजेट वाढले; खर्चाचा आकडा भुवया उंचावणारा

Ambegaon Connectivity : आपटी (खेतेपठार) ग्राममार्गाला वनविभागाची परवानगी; रस्ता मजबुतीकरणामुळे आंबेगाव-जुन्नर सीमेवरील दळणवळण सुलभ

Jalgaon News : जळगाव शहरातील चौपदरी महामार्गावर ‘व्हाइट टॉपिंग’; ‘गिरणे’वर समांतर पूल होणार

SCROLL FOR NEXT