Pune Airport Sakal
देश

...तर गेला असता ४०० लोकांचा जीव; काय घडले होते आकाशात?

विमान वाहतूक नियामक या घटनेची चौकशी करीत आहे

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू विमानतळावर (Bangalore Airport) उड्डाण केल्यानंतर लगेचच इंडिगोची दोन विमानांमध्ये हवेत टक्कर होण्यापासून (Survived a plane crash) वाचली. या घटनेची नोंद कोणत्याही लॉगबुकमध्ये करण्यात आलेली नाही. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्याची नोंद केली नाही, असे विमान वाहतूक नियामक डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठा अपघात टळल्याने सुमारे ४०० लोकांचा जीव वाचला. ही घटना ९ जानेवारीला सकाळी घडली होती.

विमान वाहतूक नियामक या घटनेची चौकशी करीत आहे. दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार म्हणाले. याप्रकरणी इंडिगो आणि एएआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडिगोची दोन विमाने - ६E४५५ (बेंगळुरू ते कोलकाता) आणि ६E२४६ (बेंगळुरू ते भुवनेश्वर) अशी दोन विमानांची नावे आहेत. जेव्हा एअरस्पेसमध्ये दोन विमाने किमान अनिवार्य उभ्या किंवा क्षैतिज अंतर ओलांडतात तेव्हा विभक्ततेचे उल्लंघन होते.

९ जानेवारीला सकाळी सुमारे पाच मिनिटांत दोन विमानांनी बेंगळुरू विमानतळावरून उड्डाण केले. उडल्यानंतर दोन्ही विमाने एकमेकांच्या दिशेने जात होती. ‘अ‍ॅप्रोच रडार कंट्रोलर’ने दिशा वळवणारे हेडिंग सूचित (Survived a plane crash) केले. ज्यामुळे दोन विमानांमधील हवेतील टक्कर टळली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT