Bangalore Police Arrested Young Man esakal
देश

धक्कादायक! कर्नाटकात गायींसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य, आरोपीला अटक

आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती.

सकाळ डिजिटल टीम

आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती.

बंगळुरु : गेल्या काही वर्षांत मुक्याप्राण्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील बंगळुरुमधून (Bangalore Karnataka) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका 34 वर्षीय व्यक्तीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करताना अटक केलीय. या आरोपीनं अनेक गायींसोबत असे अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.

हा आरोपी येथील एका विद्यालयाच्या परिसरात झाडांच्या मागे जात गायींसोबत (Cow) अनैसर्गिक कृत्य करायचा. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आलीय. मंजूनाथ असं या आरोपीचं नाव आहे. तो मांड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलागेरे गावातील रहिवासी आहे. मंजूनाथच्या मित्रानं दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गायींसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची सवय लागली होती. त्यामुळं तो बंगळुरुमधील एका विद्यालयाच्या मैदानात जात. तिथं चरायला येणाऱ्या गायींना झाडांच्या मागे नेत अनैसर्गिक कृत्य करायचा. याबाबतची माहिती मंजूनाथच्या मित्रानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मंजूनाथला गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मंजूनाथवर प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT