Mosque for Transgender Community Esakal
देश

Mosque for Transgender Community: 'या' देशात तृतीयपंथी समुदायासाठी उघडली पहिली मशीद

Mosque for Transgender Community: रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये बांगलादेशातील ढाका येथे तृतीयपंथी समुदायासाठी एक मशीद उघडण्यात आली आहे. सरकारने दान केलेल्या जमिनीवर ही मशीद बांधण्यात आली आहे. या मशिदीभोवती भिंत आहे तर पत्र्याचे छत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Mosque for Transgender Community: रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये बांगलादेशातील ढाका येथे तृतीयपंथी समुदायासाठी एक मशीद उघडण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर मयमनसिंगजवळ सरकारी दान केलेल्या जमिनीवर तृतीयपंथी समुदायासाठी मशीदीची स्थापना करण्यात आली आहे.

तृतीयपंथी समुदायाने निर्णयाचे केले स्वागत

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशातील तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांनी नवीन मशीद बांधण्याच्या आणि परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तृतीयपंथी समुदायाच्या नेत्या जोयिता टोनू यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, यापुढे कोणीही तृतीयपंथी व्यक्तीला आमच्या मशिदीत प्रार्थना करण्यास नाकारू शकत नाही.

ही मशीद सरकारने दान केलेल्या जमिनीवर उभारण्यात आली आहे. मशिदीच्या चारही बाजुला भिंत बांधण्यात आली आहे. तर वरती पत्र्याचे छत केले आहे.

तृतीयपंथी सोनिया यांनी व्यक्त केला आनंद

42 वर्षीय सोनिया म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्यात पुन्हा मशिदीत नमाज पढू शकेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. सोनियाने सांगितले की, त्यांना लहानपणापासून कुराण वाचनाची आवड होती आणि ती इस्लामिक मदरशात शिकत असे.

मशिदीत नमाज पढण्यास घातली होती बंदी

सोनियाने सांगितले की, जेव्हा लोकांना ती ट्रान्सजेंडर असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिला मशिदीत नमाज पढण्यापासून रोखण्यात आले. सोनियाने न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले की लोक तिला सांगत असत की ती तृतीयपंथी आहे, त्यामुळे ती मशिदीत येऊ शकत नाही. तृतीयपंथी केवळ घरीच प्रार्थना करू शकतात आणि त्यांनी मशिदींमध्ये येऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : मकर संक्रांतीला सोनं खरेदी करायचा विचार करताय? आधी आजचे भाव पाहा आणि मग खरेदी करा

Kolhapur Missing Ex Sarpanch : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती? कोल्हापुरातील माजी सरपंच बेपत्ता, जंगलात जळालेली हाडे सापडली अन्

वास्तव की भ्रम? मानसशास्त्रीय थ्रिलर ‘केस नं. ७३’मध्ये अशोक शिंदेंचा दमदार कमबॅक

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

Pune Temperature : पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ; दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत

SCROLL FOR NEXT