Abu Azmi Reacts to Bangladesh Violence Case

 

esakal

देश

Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

Abu Azmi reaction on Bangladesh Mob Lynching: जाणून घ्या, देशातील घटनांचा उल्लेख करत मीडियासमोर नेमकं काय म्हणाले आहेत अबू आझमी?

Mayur Ratnaparkhe

Hindu Youth Brutally Killed in Bangladesh : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंगचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की,  कुणीसोबत चुकीचं वागणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. मग तो हिंदू असो वा मुस्लिम, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

या घटनेवर मीडियाला प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले, "हिंदू असो वा मुस्लिम, जर कोणी कुणासोबत चुकीचं करत असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. जिथे कुठे असे घडते, कुणासोबतही घडले तरी त्याचा निषेध केला पाहीजे. पण आधी मी माझ्याच देशात घडणाऱ्या घटनांचा निषेध करायला नको?"

अबू आझमी पुढे म्हणाले, "आपल्याच देशात, ज्यांच्यासाठी मुस्लिमांनी स्वातंत्र्याचा लढा दिला आणि ज्यांनी कधीही देशाशी विश्वासघात केला नाही त्यांना आता 'देशद्रोही' म्हटले जात आहे. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?"

बांगलादेशच्या अंतरिम सरकारनेही हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही मैमनसिंहमध्ये एका हिंदू व्यक्तीच्या मॉब लिंचिंगच्या घटनेचा तीव्र निषेध करतो. नवीन बांगलादेशात अशा हिंसाचाराला जागा नाही. या घृणास्पद गुन्ह्याच्या गुन्हेगारांना सोडले जाणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT