sheikh hasina in india esakal
देश

Bangladesh Crisis: बांगलादेशातल्या हिंसाचाराचा भारतावर परिणाम; 'या' राज्याने लावला कर्फ्यू

Sheikh Hasina Resigns: बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसेच्या परिणाम भारतावरदेखील पडत आहेत. भारतातील एका राज्याने रात्रीचा कर्फ्यू लावला आहे. बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेले भारतातील राज्यंदेखील हाय अलर्टवर आहेत.

संतोष कानडे

Night Curfew on Meghalaya Border: देशामध्ये वाढलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर आणि आंदोलकांनी पंतप्रधान निवासाकडे कूच केल्याचे कळताच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी लष्कराच्या मदतीने देश सोडला. त्यांनी देश सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड, जाळपोळ आणि नासधूस केली.

पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्या पुढे लंडनला जातील, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या भारतातील वास्तव्याच्या संबंधाने सोमवारी रात्रीपासून उच्चस्तरिय बैठका सुरु आहेत. तिकडे बांगलेदेशात आंदोलकांनी जल्लोष केला.

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसेच्या परिणाम भारतावरदेखील पडत आहेत. भारतातील एका राज्याने रात्रीचा कर्फ्यू लावला आहे. बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेले भारतातील राज्यंदेखील हाय अलर्टवर आहेत. यातच मेघायलमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. याची माहिती मेघालयाचे मुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसॉन्ग यांनी दिली. हा निर्णय सीमा सुरक्षा दल आणि मेघायलय पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसोंग यांनी म्हटलं की, राज्य सरकारने बांगलादेशमधील सद्य परिस्थिती बघता आंतरराष्ट्रीय सीमा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ४४४ किलोमीटरपेक्षा जास्त विस्तारलेल्या भागामध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्यात येत आहे. पुढील आदेश येईपर्यंत रोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळत कर्फ्यू लागू असेल.

दरम्यान, हसीना यांच्या भारतातील आगमनावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली असून हसीना यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. बांगला देशातून आपल्या कुटुंबियांसह अजॅक्स-१४३१ या विमानातून पळ काढल्यानंतर शेख हसीना कोणत्या देशात आश्रय घेणार, याविषयी सुरुवातीला उलटसुलट चर्चा सुरु होती. पण सरतेशेवटी दिल्लीत तात्पुरता आश्रय घेऊन लंडनला जाण्याच्या इराद्याने शेख हसीना यांचे विमान हिंडन हवाई तळावर उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT