देश

अयोध्येत महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, चिठ्ठीत IPS अधिकाऱ्याचं नाव

श्रद्धाने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट का केला?

दीनानाथ परब

लखनऊ: सरकारी बँकेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने शनिवारी आत्महत्या (suicide) करुन जीवन संपवलं. श्रद्धा गुप्ता (Shraddha Gupta) असं मृत महिलेचं नाव आहे. राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन श्रद्धाने जीवन संपवलं. उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये (Ayodhya) ही घटना घडली आहे. सध्यातरी ही आत्महत्या वाटत असली, तरी पोलीस हत्येच्या अंगानेही तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

श्रद्धाच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीत श्रद्धाने एका आयपीएस अधिकाऱ्याचे नाव नमूद केले आहे. या पत्रात अयोध्येत एसएसपी असणारे आशिष तिवारी, विवेक गुप्ता आणि अनिल रावत या तिघांची नाव आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

श्रद्धा गुप्ता यांनी २०१५ मध्ये बँकेत क्लार्क म्हणून नोकरी सुरु केली होती. त्यानंतर खात्यातंर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रमोशन मिळवले. २०१८ साली फैझाबादमध्ये त्यांची पोस्टिंग होती. अयोध्या पोलिसांनी विवेक गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चिठ्ठीत नाव असलेल्या तिघांविरोधात अयोध्या पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणारे कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अनिलचे दुसऱ्या मुलींसोबत प्रेमसंबंध होते. त्या बद्दल श्रद्धाला समजलं होतं. त्यामुळेच माझ्या मुलीने त्याच्यासोबत लग्न करायला नकार दिला, असे श्रद्धाची आई सुनीताने सांगितलं. अनिल, आशिष विवेकचे मित्र होते, असा कुटुंबीयांचा दावा आहे. काल सकाळी दुधवाल्याने दरवाजा ठोठावला. पण आतून काही प्रतिसाद आला नाही. त्याने घराचे मालक गुप्ता यांना याची माहिती दिली. त्यांनी खिडकीतून आता डोकावून बघितले, त्यावेळी श्रद्धा गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT