Bank Holiday Diwali 2024 Sakal
देश

Diwali Bank Holidays: दिवाळीमुळे बँका कधी बंद राहतील? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या

Diwali Bank Holidays 2024: दिवाळीचा सण जवळ आला असून अनेक राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्याही सुरू होणार आहेत. दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

Vrushal Karmarkar

दिवाळी 2024 मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 पासून धनत्रयोदशीने सुरू होत आहे. 31 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी सण आहे. अशा स्थितीत बँकांच्या सुट्यांबाबत अनेकांच्या मनात विचार येतो की, जर दिवाळी 31 ऑक्टोबरला असेल तर दिवाळीची सुट्टी 31 ऑक्टोबरला आहे की 1 नोव्हेंबरला?

दिवाळीसाठी बँकांच्या सुट्या साधारणपणे 31 ऑक्टोबरपासून सुरू होतात. पण अनेक राज्यांमध्ये १ नोव्हेंबरलाही बँका बंद राहणार आहेत. काही राज्यांमध्ये 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर अशी सलग चार दिवस सुट्टी असेल. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात.

कोणत्या राज्यात बँकांना सुटी कधी आहे?

31 ऑक्टोबर: आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

1 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीर, कर्नाटक, सिक्कीम, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये बँका बंद राहतील.

2 नोव्हेंबर : राजस्थान, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

दिवाळीच्या सणानिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. बँक शाखा बंद राहतील, परंतु बँकेच्या डिजिटल सेवा चालू राहतील. तुम्ही तुमचे बँकिंग काम ऑनलाइन करू शकता. तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपचा वापर करू शकता रोख रक्कम काढणे. आरटीजीएस/एनईएफटी सेवा सामान्यपणे काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मोठा पराक्रम, मोडला मुंबई इंडियन्सचा विक्रम...

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

SCROLL FOR NEXT