dr. subhash sarkar and arup chakraborty sakal
देश

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

सलग नऊवेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने(माकप) आपल्या ताब्यात राखलेल्या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा उमेदवार जिंकून आणला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सलग नऊवेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने(माकप) आपल्या ताब्यात राखलेल्या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा उमेदवार जिंकून आणला. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्यामुळे त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

एकेकाळी हा मतदारसंघ ‘माकप’चा बालेकिल्ला मानला जात होता. माकपचे ज्येष्ठ नेते वासुदेव आचार्य याच मतदारसंघातून सलग नऊवेळा निवडून आले होते. परंतु विजयाची ही परंपरा २०१४ मध्ये खंडित झाली. पश्चिम बंगालच्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे प्रमाण कमी आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार आठ टक्के तर दलित ३१ टक्के आणि आदिवासी ११ टक्के आहेत.

‘माकप’चा परंपरागत मतदार हा भाजप आणि ‘टीएमसी’मध्ये विभागला गेला. याचाही फायदा भाजपला मिळत आहे. उच्च शिक्षित असलेल्या डॉ. सुभाष सरकार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात ‘टीएमसी’ने अरुप चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली.

गेल्यावेळी काँग्रेसमधून ‘टीएमसी’त दाखल झालेले सुब्रत मुखर्जी यांना उमेदवारी दिली होती. परंतु ते बाहेरचे असल्याने पक्षांतर्गत वाद निर्माण झाला होता. यावेळी ‘सीपीएम’ने निलांजन दासगुप्ता यांना उमेदवारी दिली असली तरी खरी लढत डॉ. सुभाष सरकार आणि टीएमसीचे अरुप चक्रवर्ती यांच्यातच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT