Crime Sakal Digital
देश

धक्कादायक! दुसऱ्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आलीय.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आलीय.

जयपूर : राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात (Banswara District) माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आलीय. एका महिलनं वाटेत मित्राकडून गाडीवर लिफ्ट घेतली. हे महिलेच्या नवऱ्याला समजल्यावर त्याचा माथा फिरला यानंतर नवऱ्यानं महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी पीडितेचा शोध घेतला आणि या प्रकरणाची दखल घेत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत.

आरोपी नराधम पतीनं आपल्या पत्नीला झाडाला बांधून जबर मारहाण केलीय. इतकी क्रूर शिक्षा करण्याचे कारण ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल. यामध्ये पीडित महिलेनं एका पुरुष मित्राकडून लिफ्ट घेतल्यामुळं नाराज झालेल्या पतीनं आपल्या पत्नीला असं झाडाला बांधून मारलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ही घटना बांसवाडाच्या घाटोल सर्कल या ठिकाणी घडलीय. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचं स्प्ष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. रात्री सुमारे दोनच्या सुमारास या पती-पत्नीला शोधून काढण्यात आलं. यानंतर पीडित महिलेनं रात्री एफआयआर दाखल केली. यानंतर आरोपी पती, महावीर, दीर कमलेश, भावजय सुंका आणि मामे सासऱ्यांनी या दोघांना दांडक्यांनी आणि बुटांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT