देश

बाराबंकीत भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पहाटेच्या सुमारास बस आणि ट्रकची धडक झाली. यात जवळपास २५ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. डबल डेकर बसचा या अपघातात चक्काचूर झाला आहे. तर ज्या ट्रकला बस धडकली त्याचेही नुकसान झाले आहे. या अपघातात १३ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती समोर येत आहे. पहाटेच्या सुमारास बस आणि ट्रकची धडक झाली. यात जवळपास २५ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माती रोडवर चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाळूच्या ट्रकला बस धडकली. अपघातानंतर ट्रकचा चालक पळून गेला आहे. बस दिल्लीहून बहराईचला जात होती असे सजमते.

जखमींना बाराबंकीमधील ट्रामा सेंटरमध्ये दाखल केलं आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना लखनऊला पाठवण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून रस्त्यावर गाड्यांचे पडलेले अवशेष बाजूला काढले जात आहेत.

अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसंच जखमींना उपाचारासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. याशिवाय ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT