chief minister Basavaraj Bommai sakal
देश

‘काँग्रेस’ पवित्र आहे काय? - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

भ्रष्टाचारावर काँग्रेसने शनिवारी ‘तुमच्यापेक्षा पवित्र’अशी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘काँग्रेस’पवित्र आहे काय, असा टोला दिला.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - भ्रष्टाचारावर (Corruption) काँग्रेसने (Congress) शनिवारी ‘तुमच्यापेक्षा पवित्र’अशी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ‘काँग्रेस’पवित्र आहे काय, असा टोला दिला. कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूची चौकशी कायद्यानुसारच होईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने निषेध जाहीर केला आहे. ते भ्रष्टाचारावर बोलतात. ते स्वच्छ आहेत का, ‘काँग्रेस पवित्र आहे का, त्यांना त्यांच्या कपाटात ठेवलेल्या संपत्तीची आधी गणना करू द्या, असे बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना टोला लगावला.

कर्नाटकातील जनतेने अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांचे गैरव्यवहार पाहिले आहेत. आम्हाला ते गैरव्यवहार जनतेसमोर ठेवावे लागतील, असे बोम्मई म्हणाले. कंत्राटदार पाटील यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे भाजपचे ज्येष्ठ आमदार के. एस. ईश्वराप्पा यांचे संरक्षण केल्याचा काँग्रेसने सरकारवर आरोप केला होता. त्यावर बोम्मई बोलत होते.

आत्महत्येच्या आरोपाची चौकशी सुरू आहे. उत्तरीय तपासणी करून फॉरेन्सिक अहवाल येईल. त्याआधारे आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या काय झाले हे समजू. या वेळी त्यांनी के. जे. जॉर्ज प्रकरणाचा उल्लेख केला. भाजपने काँग्रेसपेक्षा कायद्याचे पुस्तक चांगले पाळले आहे. जॉर्ज प्रकरणात, त्याच्यावर आरोप करणारा व्हिडिओ व मृत्यूची नोंद होती. पण, एफआयआरमध्ये त्याचे नाव होते का? प्रकरण झाकण्याचा प्रयत्न तर नव्हता ना? कोर्टाच्या निर्देशानंतर एफआयआर नोंदवल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment: विमानतळ भरतीच्या नावाखाली संभाजीनगरमध्ये विद्यार्थी वेठीस; परीक्षा घेणारेच गायब; केंद्रावर सोयी-सुविधांचाही अभाव

SCROLL FOR NEXT