Basmati Rice Sakal
देश

Basmati Rice : बासमती तांदळाची चव कायम राहणार; केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

याबाबत केंद्रकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

FSSAI Notification For Basmati Rice : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारतात पहिल्यांदाच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानके अधिसूचित केले आहेत. याबाबत केंद्रकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

नवीन मानकांनुसार बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असावा तसेच हा तांदुळ कृत्रिम रंग, पलिशिंग एजंट आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा असे आदेश दिले आहेत. नवीन मानकं 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होतील.

बासमती तांदळाचा व्यावसाय सुधारणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा नव्या मानकांचा उद्देश असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

देशात भाबासमतीच्या 35-39 जाती

भारतात बासमती तांदळाच्या सुमारे 35-39 विविध जाती आहेत. APEDA कडील डेटानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान बासमती तांदळाची शिपमेंट 2.73 दशलक्ष टन (mt) पर्यंत वाढली आहे.

2021-22 मधील 2.4 दशलक्ष टनांच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये भारतातून 1.6 दशलक्ष टन तांदूळ निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT