batsman killed bowler with bat after throw wide ball in UP 
देश

धक्कादायक! गोलंदाजाची डोक्यात बॅट घालून मैदानावरच हत्या

वृत्तसंस्था

सुजानगंज (उत्तरप्रदेश) : गोलंदाजाने वाईड बॉल टाकला म्हणून फलंदाजाने डोक्यात बॅट घालून हत्या केली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील सुजानगंज येथील बलहामाऊ गावात घडली आहे. फलंदाजावर सध्या कलम 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप  गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही.

उत्तरप्रदेशातील या गावात काही तरुण मिळून क्रिकेट खेळत असताना दोन गटांमध्ये वाद झाल. यावेळी गोलंदाज रजनीश पांडे हा गोलंदाजी करत होता. यावर गोलंदाजाने गोलंदाजी केली असता टाकलेला बॉल हा वाईड असल्याच्या कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. या एका गोष्टीवरून दोघांमधील वाद टोकाला गेला आणि फलंदाज अंबुजने रजनीशच्या डोक्यात बॅट घालून त्याची हत्या केली. यात रजनीश पांडे जागीच बेशुद्ध झाला होता.

विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास, महिलांसाठी मार्शल; आपकडून गॅरंटी कार्ड

झालेली घटना इतर खेळाडूंनी रजनीशच्या घरच्यांना कळवताच त्यांनी त्याला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी प्रयागराजला जाण्यास सांगितले. दरम्यान, प्रयागराजला जात असताना वाटेतच रजनीशचा मृत्यू झाला. पोलिस आरोपी अंबुज मिश्रा याचा शोध घेत असून तो सध्या फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT