BBC Delhi Office Sakal
देश

BBC IT Raid: "अदानींना शेव फरसाण आणि..."; विरोधक संतापले, कॉंग्रेसच्या मते ही तर अघोषित आणीबाणी

काही दिवसांपूर्वी बीबीसीने गुजरात दंगलीसंदर्भात एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली होती.

सकाळ डिजिटल टीम

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यावरुन आता देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसने याला अघोषित आणिबाणी म्हटलं आहे.

बीबीसीच्या कार्यालयावर झालेल्या छापेमारीनंतर काँग्रेसने आपल्या ट्वीटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "आधी बीबीसीची डॉक्युमेंट्री आली, तिच्यावर बंदी घातली. आता बीबीसीवर आयकर विभागाचा छापा पडला. अघोषित आणीबाणी."

तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. "इथं आम्ही अदानींच्या प्रकरणामध्ये जेपीसीची मागणी करत आहोत. आणि तिथे सरकार बीबीसीच्या मागे लागली आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी!", असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही या छाप्यांवरती खोचक प्रतिक्रिया दिली आहे. "बीबीसीच्या दिल्लीतल्या ऑफिसवर आयकर विभागाचे छापे. खरंच? किती अनपेक्षित? दरम्यान, सेबी ऑफिसच्या चेअरमनशी गप्पा मारायला गेलेल्या अदानींना शेव फरसाण वाटलं जात आहे", असं महुआ मोईत्रा खोचकपणे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT