BBC Documentary 
देश

BBC Documentary : JNU पाठोपाठ केरळमध्येही गोंधळ; स्क्रीनिंगच्या वेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बीबीसी डॉक्युमेंटरीवरून सुरू असलेल्या वादाला आता हिंसक वळण लागलं आहे. केरळमधील काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी सायंकाळी उशिरा ही डॉक्युमेंट्री दाखविण्यात आली. मात्र याच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाने गोंधळ घातला. तसेच याविरोधात युवा मोर्चाच्या वतीने मोर्चाही काढण्यात आला. याआधी जेएनयूमध्ये देखील डॉक्युमेंट्रीवरून गदारोळ झाला होता. ( BBC Documentary news in Marathi)

काहींनी राजधानी तिरअनंतपुरमध्ये पोलिसांशी झटापटही केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलांकवर पाण्याचा मारा केला. ज्यामुळे हिंसक आंदोलनातील अनेक कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.

सत्ताधारी माकपची युवा शाखा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने (डीवायएफआय) ही डॉक्युमेंट्री दाखविण्याचे आयोजन केले होते. भाजपने त्याला कडाडून विरोध केला होता. भाजप कार्यकर्त्यांनी स्क्रिनिंगच्या ठिकाणी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले तेव्हा, त्यांनी बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

पलक्कड आणि वायनाड जिल्ह्यातही अशाच प्रकारची निदर्शने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हा माहितीपट दाखवण्याचा निर्णय युवक काँग्रेसने घेतला आहे. माहितीपट दाखविण्याच्या निर्णयाला ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे नेते अनिल के. अँटनी यांनी पाठिंबा दिला आहे. आता या डॉक्युमेंटरीवरून देशभरात गदारोळ वाढत आहे.

२००२ च्या गुजरात दंगलीबद्दल असल्याने डॉक्युमेंट्रीवरून वाद वाढला आहे. भारत सरकारने सोशल मीडिया आणि व्हिडिओ शेअरिंग कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डॉक्युमेंटरी किंवा त्याच्या लिंक काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या माहितीपटात वस्तुनिष्ठतेचा अभाव असल्याचा सरकारचा आरोप आहे. ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचंही सरकारने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT