BBC Gujrat Documentry sakal
देश

BBC Gujrat Documentry : बीबीसीचा ‘गुजरात' माहितीपट हा निव्वळ दुप्रष्चार

भारताकडून तीव्र प्रतीक्रिया

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - गुजरातमधील २००२ च्या दंगलींवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेला माहितीपट म्हणजे निव्वळ "दुप्रप्रचाराचा हिस्सा" आहे, अशा शब्दांत भारत सरकारने आज संताप व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा जळीत कांडाननंतर त्या संपूर्ण राज्यात भीषण जातीय दंगली उसळल्या होत्या व त्यात हजारो नागरिकांनी जीव गमावला होता. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीने मोदीयांना ‘क्लीन चिट' दिली होती. या प्रकरणात समितीला मोदींविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत याकडेही सरकारने लक्ष वेधले आहे.

सरकार अशा पध्दतीच्या माहितीपटांचे चित्रपटाचे समर्थऩ करू शकत नाही असे नमूद करून सरकारच्या वतीने सांगण्यात आले की बीबीसीचा पंतप्रधानांवरील माहितीपट अपप्रचार, पक्षपाती आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवतो. असा माहितीपट २०२२ -२३ मध्ये तयार करण्यामागील ‘अजेंडा‘ काय आहे, हे आम्हाला माहिती नाही असेही केंद्राने म्हटले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या माहितीपटाबाबत तव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अलीकडेच प्रसारित झालेला बीबीसीचा माहितीपट हा २००२ च्या गुजरात दंगलीतील मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अपप्रचाराचा भाग आहे.

बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन्स ’ या दोन भागांच्या मालिकेवर देशभरातूनही तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने नमूद केले की एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी असे माहितीपट जाणीवपूर्वक तयार केले जातात आणि त्यामागे एक अजेंडा आहे जो चुकीच्या माहितीच्या मोहिमेचा भाग आहे असे आम्हाला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वास

SCROLL FOR NEXT