BBC Narendra MOdi Sakal
देश

BBC ला डॉक्युमेंटरी भोवली? देशभरातील कार्यालयावर का झाली छापेमारी?

कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले असून त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : BBC या वृत्तसंस्थेच्या देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे ६० ते ७० अधिकारी बीबीसी दिल्ली येथील कार्यालयात पोहोचले असून त्यांनी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले असल्याची माहिती आहे. तर कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भाजपवर टीका केली जात आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, BBC ने 'India The Modi Question' हा माहितीपट प्रदर्शित केला होता. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गोधरा हत्याकांडावर ही डॉक्युमेंटरी होती. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारकडून या डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्यात आली होती. BBC कडून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला.

या सगळ्या प्रकरणानंतर डॉक्युमेंटरीचा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. बीबीसीवर भारतात बंदी घालावी अशी याचिका भाजपकडून कोर्टात दाखल केली होती पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान, गोधरा हत्याकांडावरील ही डॉक्युमेंटरी BBC ला भोवली का? असा सवाल आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

कर चुकवेगिरीच्या संशयातून छापेमारी

आयकर विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयातून BBC च्या दिल्ली येथील कार्यालयावर छापा टाकला आहे. विभागाची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली असून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून BBC चे पुढचे पाऊल काय असेल हे महत्त्वाच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon El Nino Impact India : यंदा एल निनोचा इशारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Thalapathy Vijay: बहुमतापासून १० आमदार दूर; काँग्रेसच्या ५ जागांवर TVK चा खेळ कसा फिरणार? सत्ता स्थापनेची समीकरणे कशी बदलणार

Congress Muslim Candidates Success : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांत मुस्लिम सर्वाधिक; आसाम ते केरळपर्यंत 'मुस्लिम' उमेदवारांचाच स्ट्राइक रेट जबरदस्त!

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरावर आज पुन्हा झळकणार भगवी धर्मध्वजा, धार्मिक वैभवाचा ऐतिहासिक क्षण

Kerala Election Results : डाव्यांचा शेवटचा बालेकिल्लाही ढासळला! केरळमध्ये 'माकप'चा दारुण पराभव; राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही धोक्यात

SCROLL FOR NEXT