BBC Narendra MOdi Sakal
देश

BBC IT Raid: बीबीसीवरील छापेमारीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ; वाचा काय म्हणताहेत नेटकरी

इन्कम टॅक्स विभागाकडून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स विभागाकडून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळं बीबीसीचा मुद्दा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड झाला असून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली मत व्यक्त केली आहेत. या छापेमारीला राजकीय दबावापोटी कारवाई झाल्याचं म्हटलं आहे. (BBC IT Raid Trending on Social Media Read what netizens are saying)

इन्कम टॅक्सच्या टीमला चुकीचा पत्ता मिळाला. त्यांना अदानीच्या हेडॉक्वार्टरला जाण्यास सांगितलं होतं, पण चुकून ते बीबीसाच्या कार्यालयात पोहोचले असा खोचक टोला लेखिका आणि पत्रकार राणा आयुब यांनी ट्विट करत मोदी सरकारला लगावला आहे. आयुब या गुजरात फाईल्स या पुस्तकाच्या लेखिका आहेत.

तसेच तृणमुल काँग्रेसच्या खसदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत म्हटलं, "वॉव्व खरचं! किती अनपेक्षित? अदानी सेबीच्या कार्यालयात गप्पा मारण्यासाठी येतात तेव्हा त्यांना फरसाण-चिवडा दिला जातो. तर बीबीसीवर मात्र इन्कम टॅक्सची धाड पडते"

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी म्हटलं, "मोदी सरकारनं आता सर्वकाही गमावलं आहे. बीबीसीच्या कार्यालयावर छापा टाकल्यानं सन २००२ मधील गुजरात दंगलीत मोदींचा सहभाग असल्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बीसीसीनं यावर डॉक्युमेंट्री बनवून हे सिद्ध केलं आहे"

प्राध्यापक असलेल्या अशोक स्वॅन यांनी ट्विट करत म्हटलं की, "मोदींच्या इन्कम टॅक्स विभागानं बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी झाली. जगातील तथाकथित सर्वात मोठ्या लोकशाही देशात माध्यम स्वातंत्र्याची ही अवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : मुळशीत आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसोबत विक्रेत्याचं धक्कादायक कृत्य; गावकऱ्यांचा संताप!

'सनी देओल माझ्या आयुष्यातील काळा अध्याय' प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेत्याबद्दल म्हणाले...'देव सगळं बघतोय, न्याय होईल'

Dhairyasheel Mohite Patil: शिवसेनेसोबत वैचारिक युती; धैर्यशील मोहिते-पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण, प. बंगालमध्ये ९० लाख मतदार गायब!

MP Medha Kulkarni: ‘कॉर्पोरेट जिहाद’वर संसदेत आवाज उठवणार; खासदार मेधा कुलकर्णी यांचा इशारा, तरुणांच्या विचारसरणीवर आक्रमण..

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनी १८ मे रोजी निवृत्त होतोय? पाच वर्षांपूर्वी त्याने तसं म्हटलं होतं अन्...

SCROLL FOR NEXT